Om देव प्रतिमांचे प्रयोजन
About the Book: काय आहे या पुस्तकात? एका शब्दात सांगायचे झाले तर "स्पष्टता" आणि शब्दसमूहात सांगायचे झाले तर ... - देव प्रतिमांच्या प्रयोजनामागचे शास्त्रशुद्ध कारण, - "Law of Attraction" या विषयाचे सोप्यात सोप्या शब्दात स्पष्टीकरण, - नऊ प्रमुख देवांचे अगदी सोप्या पद्धतीने आकलन - श्री गणेश, श्री शिव, श्री कार्तिकेय, श्री गुरू दत्तात्रेय, श्री दुर्गा, श्री लक्ष्मी, श्री सरस्वती, यमदेव आणि श्री चित्रगुप्त - आणि आजच्या पिढीला अनुत्तरित असलेल्या बर्याच रहस्यमयी प्रश्नांची विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उत्तरे मिळतील...उदाहरणार्थ, - श्री गणेशाला गजमुख दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय? - श्री लक्ष्मीला शयनावस्थेतील श्रीविष्णूचे पाय चेपतानाच का दाखवले जाते? - शिवलिंग आणि नंदी यांच्या रचनेचे रहस्य काय? - सापाला शंकराच्या गळ्यातच का बरे दाखविले जाते ? - स्त्रियांनी श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचे का टाळावे? - सर्व देवतांना वाहन म्हणून सरसकट हत्ती-घोडे न देता, उंदीर, मोर, नंदी, रेडा, हंस इत्यादि पशू वाहन म्हणुन दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे? - सर्व हिंदू धर्मियांनी अगदी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. - हिंदू धर्मियांसाठी धर्माच्या ठायी असलेला अभिमान निश्चितच उंचावणारे असे हे पुस्तक आहे.
Visa mer